आमच्याबद्दल
रवळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव आदिवासी बहुल भागातील असून सन २०११ च्या जनगणनेनुसार २८६० इतकी लोकसंख्या आहे. गयाचीवाडी, खोटऱ्याचीवाडी, सिह्याचीवाडी अशा छोट्या वस्त्या असलेले हे समूह ग्रामपंचायत आहे.
गावामध्ये जिल्हा परिषद शाळा – ३, प्राथमिक उपकेंद्र – १, आश्रमशाळा – १, अंगणवाडी – ४, व्यायामशाळा – २, धार्मिक देवस्थाने – ७, छोटे-मोठे धरणे – ४, शासकीय रोपवाटिका – १ अशी सोय आहे. सप्तसूत्रीचे पालन करणारे सर्वगुणसंपन्न असे हे गाव आहे.
या गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. अनुसया पांडुरंग टळोंगारे यांनी हा मान मिळवलेला आहे. गावास घरकुल योजना, स्वच्छता, लिंग गुणोत्तर, पाणलोट विकास या क्षेत्रात विविध पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत.
भौगोलिक माहिती
हे गाव दिंडोरी तालुक्यातील असून दिंडोरी तालुक्याच्या दक्षिण दिशेला नाशिक शहराच्या बाजूला आहे. नाशिक तालुक्याच्या सीमेजवळ वसलेले हे गाव आहे.
गावाचे एकूण क्षेत्रफळ १६२४.५१ हेक्टर असून यामध्ये काही क्षेत्र पाटबंधारे विभाग, वनविभाग, ग्रामपंचायत गावठाण तसेच शेतकरी यांच्या मालकीचे आहे.
ग्रामीण जीवन
आदिवासी बहुल भाग असल्याने येथील परंपरा व सण समारंभ आदिवासी रूढीप्रमाणेच साजरे होतात.
संस्कृती व चालिरिती
लग्न, उत्सव, धार्मिक सोहळे हे आदिवासी रूढी परंपरेनुसार पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. गावातील लोक एकत्र येऊन सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करतात.
आसपासची गावे
वाडगाव, डुंगाव, दरी, गिरणारे, मातोरी, मुघंसर, मखमलाबाद, मनोली, कोचरगाव, तिल्लोली, विंचवंडी, नळेगाव, राशेगाव, उमराळे, पिंप्रे, फोपळवाडी, आंबेगण.